Sonny Ramadhin Saam TV
Sports

इंग्लंडविरुद्ध विंडीजला पहिली कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या गोलंदाजाचं निधन

वेस्ट इंडिजच्या इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी विजयादरम्यान लॉर्ड्सवरील सामन्यात रामदिनने 152 धावांत 11 विकेट घेतल्या होत्या.

वृत्तसंस्था

1950 मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा मालिका जिंकवून देणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा (West Indies Cricket Team) सदस्य असलेला महान फिरकीपटू सोनी रामदिन (Sonny Ramadhin) यांचे निधन झाले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने (Cricket West Indies) ही माहिती दिली आहे. रामदिन 92 वर्षांचे होते. इंग्लंडविरुद्ध 1950 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे पदार्पण करणाऱ्या रामदिन यांनी 1950 ते 1961 दरम्यान 43 कसोटी सामन्यांमध्ये 28.98 च्या सरासरीने 158 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजच्या इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी विजयादरम्यान लॉर्ड्सवरील सामन्यात रामदिनने 152 धावांत 11 विकेट घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजने 1950 ची ती मालिका 3-1 ने जिंकली होती.

सीडब्ल्यूआयचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी रविवारी सांगितले की, वेस्ट इंडिज क्रिकेटच्या वतीने, मी वेस्ट इंडिजच्या अव्वल खेळाडूंपैकी एक सोनी रामदिन यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. 1950 च्या दौऱ्यात त्यांनी एल्फ व्हॅलेंटाईन सोबत एकत्र येऊन क्रिकेटची 'स्पिन ट्विन' जोडी बनवली होती. ज्याच्या बळावर वेस्ट इंडीजने इंग्लंडला प्रथमच त्यांच्या भूमिवर पराभूत केले होते अशा अनेक कथा सांगितल्या जातात.

ऑफ स्पिन अन् लेग ब्रेक दोन्ही चेंडू टाकण्याची क्षमता

सोनी रामदीन यांच्याकडे दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची क्षमता होती. ते अॅक्शन न बदलता ऑफ स्पिन आणि लेग ब्रेक दोन्ही गोलंदाजी करू शकत होते. अवघ्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांच्या अनुभवाच्या जोरावर वयाच्या 21 व्या वर्षी 1950 मध्ये त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी संघात घेण्यात आले होते. त्यानंतर मालिकेत त्यांनी 377.5 षटके टाकली. 1950 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी एल्फ व्हॅलेंटाइनसोबत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

व्हॅलेंटाईनने चार कसोटीत 33 तर रामदिनने 26 बळी घेतले होते. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅलेक बेडसरने 11 बळी घेतले. सोनी रामदिनने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा चमत्कार केला. तसेच एकदा मॅचमध्ये 10 विकेट्स मिळवल्या होत्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT