Indian cricketer Smriti Mandhana and singer Palash Muchhal confirm their wedding — a new Bollywood-Cricket love story begins! saamtv
Sports

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Smriti Mandhana Marriage News: स्मृती मानधाच्या लग्नाबाबतचा सस्पेन्स आता संपलाय. स्मृती इंदौरची सून होणार असल्याचे आता स्पष्ट झालंय. पण तिचा होणारा नवरा कोण आहे. कोणत्या क्षेत्रात कार्यकर्त आहे, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार.

  • दोघांचं नातं सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत आलं होतं.

  • स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. आता एक नवीन प्रेमकहाणी समोर आली. ही कहाणी महिला क्रिकेटपटूची आहे. टीम इंडियाची ग्लॅमर गर्ल स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे. ही घोषणा तिचा प्रियकर आणि चित्रपट निर्माता-गायक पलाश मुच्छल यांनी केलीय. पलाश मुच्छल आणि मानधना यांच्यातील नात्याबद्दल मीडिया रिपोर्ट्स बऱ्याच काळापासून तर्क बांधले जात होते. कारण ते सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची सार्वजनिकपणे कबुली दिली नाहीये.

एका वृत्तसंस्थेनुसार, गायक पलाश मुच्छलच्या मते, भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे. स्मृती मानधना १९ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्याची तयारी करत आहे. त्याचवेळी हे विधान आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पलाश मुच्छल हा बॉलिवूडमधील एक संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे. त्यांनी 'ढिश्कियाऊं' या चित्रपटातून संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलीय.

यानंतर त्याने 'भूतनाथ रिटर्न्समधील "पार्टी तो बनती है" हे हिट गाणे बनवलंय. त्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या "खेलें हम जी जान से" या चित्रपटातही काम केलंय. कामाच्या बाबतीत, पलाश मुच्छल सध्या "राजू बॅण्ड वाला" या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

दरम्यान पलाश उत्कृष्ट संगीतकार असून त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक आहे, त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

दुसरीकडे स्मृती मानधनाने फार कमी वयात वर्ल्ड रेकॉर्ड्स रचले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिला महत्वाचे स्थान आहे. स्मृती आता २९ वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वी स्मृती आणि पलाश मुच्छल यांच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे स्मृती आणि पलाश यांचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT