India vs Australia Match: भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना फ्रीमध्ये कधी-कुठे बघता येणार?
भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचा पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार
सामना पर्थ स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.
जिओ हॉटस्टार अॅपवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने सुरू होतोय. पहिला एकदिवसीय सामना, भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे. त्यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले असेल.
हे दोन्ही दिग्गज खेळाडू २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहेत. कोहली आणि रोहितने कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू फक्त ५० षटकांच्या क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यापूर्वी रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलंय. तर कसोटी मालिकेनंतर शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाच्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आणि कोहली नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत.
India vs Australia चा पहिला एकदिवशीय सामना हा १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना एकदिवशीय ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या एक तास आधी होणार आहे.
कधी-कुठे पाहणार सामना?
भारतीय क्रिकेट प्रेमी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना पाहू शकतात. पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण या चॅनेलवर होणार आहे. भारतीय चाहते ऑनलाइनही हा सामना पाहू शकतात. जिओ हॉटस्टारवर ही भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामना पाहतात येणार आहे. डीडी स्पोर्ट्सवरही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना मोफत पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.