PV Sindhu Singapore Open News SAAM TV
क्रीडा

Singapore Open: पी. व्ही. सिंधू फायनलमध्ये, जपानच्या कावाकामीचा ३१ मिनिटांत खेळ खल्लास

पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं सिंगापूर ओपन २०२२ च्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला. तिनं सेमिफायनलमध्ये जपानच्या कावाकामीला अवघ्या ३१ मिनिटांत पराभूत केलं. तिनं हा सामना २१-१५ आणि २१-७ अशा मोठ्या फरकानं जिंकला.

तत्पूर्वी, सिंधू आणि कावाकामी यांच्यात दोन लढती झाल्या होत्या. दोन्ही लढतींमध्ये सिंधू सरस ठरली होती. या लढतीत सिंधूनं सुरुवातीपासूनच जपानच्या कावाकामीवर वर्चस्व निर्माण केलं होतं. सुरुवातीपासूनच ती गुणांमध्ये आघाडीवर होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली. (Singapore Open 2022 PV Sindhu defeats Japan Kawakami enters final)

पी. व्ही. सिंधूकडे (P V Sindhu) एक वेळ अशी होती की, ती या लढतीत ११-८ अशी आघाडीवर होती. जपानच्या कावाकामीने जबरदस्त सर्व्हिस आणि क्रॉस कोर्टच्या दमदार खेळानं तीन गुण मिळवले आणि ती बरोबरीत आली. त्यानंतर दोघींमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळाली. एकेक गुणासाठी दोघी झटत होत्या. मात्र, सिंधूने आपल्या अनुभवाच्या जोरावर आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१५ अशा फरकाने जिंकला. (Singapore Open)

सिंधूने दुसऱ्या गेममध्ये आपला वरचष्मा कायम ठेवला. कावाकामीला या लढतीत पुनरागमनाची संधीच दिली नाही. हा दुसरा गेम सिंधूने २१ - ७ अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जगात १९ व्या क्रमांकावर असलेल्या हैन यू हिला १७-२१, २१-११, २१-१९ अशा फरकाने नमवले होते. ही लढत तब्बल १ तास ०२ मिनिटे चालली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT