दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये भारताचा 0-2 असा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर शुभमन गिलची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुवाहाटीमध्ये 408 रन्सने झालेल्या पराभवानंतर गिल म्हणाला की, टीम इंडिया हा कठीण काळ मागे टाकून अधिक ताकदीने पुढे जाईल. हा पराभव भारताच्या टेस्ट क्रिकेट इतिहासातील रन्सच्या फरकाने सर्वात मोठा पराभव ठरला.
शुभमन गिलने X वर प्रतिक्रिया देताना लिहिलंय की, “शांत समुद्र तुम्हाला दिशा बदलायला शिकवत नाही, पण वादळ तुम्हाला स्थिर राहायला शिकवतं. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू आणि पुढे जाऊ.”
कोलकाता टेस्टमध्ये शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. या त्यामुळे पहिली टेस्ट अर्ध्यावर सोडून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर शुभमन दुसऱ्या टेस्टमधूनही बाहेर झाला होता. गुवाहाटीतील दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी तो रिकव्हर होईल अशी आशा होती. मात्र नंतर वैद्यकीय टीमने त्याला अनफिट घोषित केले आणि तो मुंबईला परतला.
गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर झाला आहे. नुकतंच गिलची भारताच्या वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वनडे सिरीज 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान खेळली जाणार आहे. गिल 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेत खेळू शकणार आहे.
गुवाहाटी टेस्टमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेने आपलं वर्चस्व राखलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने भारतासमोर तब्बल 549 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात टीम इंडियाचे फलंदाज अवघ्या १४० रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले.
या सामन्यात मार्को यानसेन भारतासाठी सर्वात मोठा विलन ठरला. त्याने फलंदाजीमध्येही 93 रन्सची खेळी केली आणि पहिल्या डावात 6 विकेट्स घेतले. तर एडन मार्करमने या सामन्यात एकूण 9 कॅच घेतले. एका टेस्ट सामन्यात सर्वाधिक कॅच घेण्याच्या विक्रमात मारक्रमच्या नावाची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.