ICC Player Of The Month Award: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जानेवारी २०२३ साठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे.पुरुष गटातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारावर भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने नाव कोरलं आहे.
आयसीसीने २०२२ पासून प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्याचा पुरस्कार मिळवण्यासाठी न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज डेवोन कॉन्व्हे आणि भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला देखील नामांकन मिळाले होते. मात्र या सर्व खेळाडूंना पछाडत शुभमन गिलने पहिल्यांदाच या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत आपले पहिले शतक झळकावल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. श्रीलंका विरुद्व झालेल्या टी-२० मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने ७,५ आणि ४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर वनडे मालिकेत त्याने २०७ धावा कुठल्या होत्या. (Latest Sports Updates)
तसेच न्यूझीलंड संघाविरुद्व झालेल्या मालिकेत देखील तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्याच सामन्यात त्याने २०८ धावांची तुफान खेळी केली होती. या द्विशतकी खेळी सह त्याने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले होते.
सतत चांगली कामगिरी करूनही त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्व सुरु असलेल्या कसोटी मालिकेत संधी दिली जात नाहीये. पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलला संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.