shubman gill double century social media
Sports

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक खेळी

Shubman Gill double century vs England : टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल यानं दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात द्विशतक झळकावलं. इंग्लंडमध्ये त्यानं ही ऐतिहासिक खेळी केली. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत त्यानं स्थान मिळवलं.

Nandkumar Joshi

Shubman Gill double century scorecard : भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं. इंग्लंडच्या भूमीत सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत गिल यानं स्थान मिळवलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया जोशात मैदानात उतरली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रित केलं. भारतीय संघाला गुंडाळून आघाडी घेता येईल असा त्यामागचा उद्देश होता. पण त्याच्या मनसुब्यांवर भारताच्या धुरंधरांनी पाणी फेरलं.

यशस्वी जयस्वालनं संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. सुरुवातीला केएल राहुलच्या रुपानं भारताला पहिला झटका मिळाला. पण त्यातून सावरून यशस्वीनं एका बाजूनं खिंड लढवली. करूण नायरच्या साथीनं त्यानं दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. पण नायर हा ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने टिच्चून फलंदाजी केली.

शुभमन गिल यानं ३११ चेंडूंचा सामना करता २०० धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक आहे. गिल यानं कसोटी संघाचं नेतृत्व करतानाही पहिलं द्विशतक झळकावलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्यानं दमदार फलंदाजी करत शतकी खेळी केली होती.

दिग्गजांच्या यादीत स्थान

भारतीय युवा फलंदाज शुभमन गिल यानं या द्विशतकासह महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये १९७९ मध्ये ओव्हल कसोटीत सुनील गावसकर यांनी २२१ धावा केल्या होत्या. तर राहुल द्रविड यानं २००२ मध्ये ओव्हलच्या मैदानावरच २१७ धावांची सुरेख खेळी केली होती. शुभमन गिल यानं यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये द्विशतक झळकावलं आहे. सचिन तेंडुलकर यानं लीड्समध्ये २००२ मध्ये १९३ धावा केल्या होत्या. तर रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये ओव्हलच्या मैदानावर १८७ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT