ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शुभमन गिलची भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या या युवा खेळाडूने फक्त २५व्या वर्षीच भारतीय क्रिकेटमध्ये आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. आयपीएलमध्ये शुभमन गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलची एकूण संपत्ती ३२ कोटी रुपये आहे. यामध्ये क्रिकेट, जाहीरात आणि इन्वेस्टमेंटमधून केलेल्या कमाईचा समावेश आहे.
पंजाबमधील फिरोजपूर येथे गिलचे आलिशान घर आहे. याशिवाय भारताच्या इतर राज्यांमध्ये देखील प्रॉपर्टी असण्याची शक्यता आहे.
गिलने नुकतीच रेंज रोवर वेलार कार विकत घेतली. याची किंमत सुमारे ८९ लाख रुपये आहे. याशिवाय, गिलला महिंद्रा थार गिफ्टमध्ये भेटली होती.
बीसीसीआयच्या A+कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये शुभमनचा समावेश आहे. यामधून तो वर्षाला ५ कोटींची कमाई करतो. तसेच शुभमनने आयपीएलमधून आतापर्यंत २३ कोटींची कमाई केली आहे. याशिवाय तो सोशल मीडिया आणि जाहीरातींमधूनही कमाई करतो.