ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुट्टीमध्ये कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करताय तर बदलापूरमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
बदलापूरमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर लेक, गार्डन्स , डॅम, रिसॉर्ट्स आणि धार्मिक स्थळे आहेत.
विष्णूबाग थीम पार्क हे इको-फ्रेंडली पार्क आहे. तुम्ही येथे झीप लाइनिंग, रोप क्लाइमबिंग सारखे अॅक्टिव्हिटी करु शकता.
कोंडेश्वर हे प्राचीन मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. बदलापूरपासून १६ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या मंदिराला नक्की भेट द्या.
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या या किल्ल्यावर तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. या गडाला हाजी मलंग दरगाह असेही म्हणतात.
ट्रेकिंगसाठी चंदेरी किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरुन तुम्हाला सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येईल.
भागीरथ धबधबा हे बदलापूरमधील हिडन जेम आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.