shubman gill twitter
Sports

IND VS AUS 4th test: अहमदाबादमध्येही गिलची त्सुनामी! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत झळकावले वादळी शतक

शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत शतक पूर्ण केले आहे

Ankush Dhavre

Shubman gill century: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय खेळाडूंनी देखील जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत शतक पूर्ण केले आहे. (Latest sports updates)

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. रोहित शर्मा आणि गिल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र रोहित शर्मा बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर त्याने चेतेश्वर पुजारासोबत मिळून डाव सावरला आहे.

शुभमन गिल हा गेल्या काही सामन्यांपासून जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुध्द झालेल्या मालिकांमध्ये धावांचा पाऊस पाडला होता.

मात्र त्याला ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरु असलेल्या ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये संधी दिली गेली नव्हती. आता संधी मिळाल्यानंतर त्याने जोरदार कामगिरी करून दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाने उभारला ४८० धावांचा डोंगर..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

Maharashtra Live News Update: काजू बागेत काम करणाऱ्या शेतकऱ्याचा हत्तीने केला पाठलाग

Supari Pan Uses : सुपारीच्या पानांचे हे ७ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Politics : शिंदेसेनेच्या महिला शाखाप्रमुखाची तक्रार, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

लहान पोरांचं भांडण, आजोबांचाच जीव गेला; रस्त्यावर रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT