sara tendulkar saam tv
Sports

Shubman Gill: तू सारा तेंडुलकरला डेट करतोय का? गिलने अखेर सांगूनच टाकलं; पाहा VIDEO

Shubman Gill On Relationship With Sara Tendulkar: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने अखेर सारा तेंडुलकरसोबत असलेल्या नात्याबाबत खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेपासून त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्यामुळे त्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. मैदानातील कामगिरीसह गिल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अनेक माध्यमातील वृत्तांमध्ये, शुभमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गिलला सारा तेंडुलकरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गिल काय म्हणाला? जाणून घ्या.

व्हिडिओ होतोय व्हायरल

गिल सध्या भारतीय संघासोबत दुबईत आहे. आपल्या शानदार फलंदाजीमुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र तो ट्रेंड करत असल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये होस्ट गिलला विचारते, तू साराला डेट करतोय का? यावर उत्तर देताना गिल म्हणतो, ’ कदाचित..’

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव खूप आधीपासून जोडलं जात आहे. दोघांचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सारा तेंडुलकर अनेकदा भारताचा सामना पाहण्यासाठी आली आहे. यासह काही महिन्यांपूर्वी ती शुभमन गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये दिसून आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीत गिल चमकला..

या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. तर गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT