Shubman gill gets angry after back to back defeat in ipl 2024 lsg vs gt match amd2000 saam tv news
Sports

Shubman Gill Statement: 'आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, पण..' सलग पराभवानंतर गिल भडकला; कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

LSG vs GT, IPL 2024: या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सलग दुसरा पराभव आहे. दरम्यान या पराभवानंतर गिल भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Statement, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी (७ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना लखनऊने गुजरातचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर १६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाचा डाव अवघ्या १३० धावांवर आटोपला. दरम्यान या एकतर्फी पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल भडकला असल्याचं पाहायला मिळालं आहे.

या पराभवानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली होती. मात्र आमच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.आम्हाला चांगली सुरुवात तर मिळाली, मात्र विकेट्स गेल्यानंतर आम्हाला त्यातून सावरता आलं नाही. आमच्या गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केली. कारण आम्ही लखनऊला १६० धावांवर रोखलं. मात्र आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराश केलं.' (Cricket news in marathi)

तसेच डेव्हिड मिलरच्या न खेळण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना गिल म्हणाला की, ' मिलर असा खेळाडू आहे जो काही षटकातच सामन्याचं चित्र पालटू शकतो. मला तरी वाटतं ही धावसंख्या आमच्यासाठी पुरेशी होती.'

आपल्या विकेटबाबत बोलताना तो म्हणाला की, ' ते पावरप्लेचं शेवटचं षटक होतं. त्यामुळे मला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. मी तो शॉट जास्तच स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो चेंडू मिस झाला. आमच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. आम्हाला त्यांना १६०-१६५ धावांवर रोखायचं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

SCROLL FOR NEXT