Shubman Gill GT VS DC X
Sports

Shubman Gill : सामना जिंकला, गुजरातने पॉईंट्स टेबलवर टॉप केले; पण एका चुकीमुळे शुबमन गिलवर झाली कारवाई

Shubman Gill IPL 2025 : आयपीएल २०२५ मधला ३५ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना गुजरातने जिंकला, पण त्यांच्या कर्णधारावर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Shubman Gill GT VS DC : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या खेळाडूंनी २०३ धावा केल्या. जोस बटलरच्या वादळी नाबाद ९७ धावांच्या योगदानामुळे गुजरातने दिल्लीला पछाडले. मुंबई इंडियन्सनंतर गुजरात टायटन्स हा दुसरा संघ आहे, ज्याने दिल्लीवर मात केली आहे. कालच्या विजयानंतर गुजरातने पॉईंट्स टेबलवर टॉप केले.

डबल हेडरमधला पहिला सामना गुजरातने जिंकला पण या सामन्यादरम्यान एका चुकीमुळे त्यांचा कर्णधार शुबमन गिलवर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर-रेटमुळे शुबमन गिलला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, शुबमन गिलवर १२ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल ३.३० वाजता सामन्याला सुरुवात झाली. सामन्यादरम्यान वातावरणात प्रचंड उष्णता होती. तापमान ४० डिग्री सेल्सियसच्या वर गेले होते. त्या वेळेस उन्हात गुजरातने प्रथम गोलंदाजी केली होती. यामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. परिणामी मध्येमध्ये हा सामना काही वेळेसाठी थांबवण्यात आला होता. यामुळे शुबमन गिलवर कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कालच्या सामन्यामध्ये शुबमन गिल मैदानातील अंपायर्सशी वाद घालत असल्याचे पाहायला मिळाले. गिलने गुजरातची गोलंदाजी सुरू असताना अंपायर्सकडे चेंडू बदलण्याची विनंती केली होती. पण अंपायर्सनी त्याची ही विनंती फेटाळली. यावरुन शुबमन गिल आणि अंपायर्स यांच्यात गरमागरमी झाल्याचे पाहायला मिळाले.

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! प्रतितोळा ₹१७१००० वर पोहचले, आठवड्यात कधी स्वस्त, कधी महाग? वाचा सविस्तर

Messy Bun Hairstyle: साडीवर शोभून दिसणारा मेसी बन कसा बांधायचा? स्टेप बाय स्टेप पद्धत

Maharashtra Live News Update : लातूर जिल्हा परिषदेत भौतिक सुविधांचा अभाव

Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं

SCROLL FOR NEXT