Shubman Gill Sara Tendulkar x
Sports

Viral Video : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? लंडनच्या पार्टीतला व्हिडीओ व्हायरल

Shubman Gill Sara Tendulkar Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र स्पॉट झाले आहेत.

Yash Shirke

Shubman Gill Sara Tendulkar : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर चर्चेत आले आहेत. शुभमन आणि सारा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. व्हायरल व्हिडीओमुळे डेटिंगच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

८ जुलै रोजी लंडनमध्ये युवराज सिंगच्या YouWeCan या कॅन्सर फाउंडेशनद्वारे चॅरिटी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ब्रायन लारा, केविन पीटरसन, विराट कोहली यांसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज हजर होते. सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि लेक सारासोबत कार्यक्रमाला पोहोचले होते. कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला सुद्धा कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते.

चॅरिटी डिनर पार्टीला व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय कसोटी संघातील खेळाडू कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताच लोक टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करु लागतात, खेळाडूंचे फोटो-व्हिडीओ काढतात. सारा तेंडुलकर देखील तिच्या फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत असते. सारा जेव्हा व्हिडीओ रेकॉर्ड करु लागली, तेव्हा शुभमन गिल तेथून निघून गेला होता. शुभमन गिल हा साराच्या समोरुन गेल्याचे व्हिडीओत कैद झाले.

बऱ्याच काळापासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेयरच्या चर्चा सुरु आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कधीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. लंडनमध्ये एकाच कार्यक्रममध्ये सारा आणि शुभमन दोघांनी हजेरी लावल्याने चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT