rohit sharma yashasvi jaiswal shubman gill google
क्रीडा

IND vs AFG: गिल की जयस्वाल; टी -२० संघात रोहितसोबत कोण करणार डावाची सुरुवात?

Team India News: आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेला येत्या जून महिन्यात प्रारंभ होणार आहे

Ankush Dhavre

Team India Opening Pair In T20I:

आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेला येत्या जून महिन्यात प्रारंभ होणार आहे. मात्र अजूनही भारतीय संघाची संघबांधणी झालेली नाही. संघाचा कर्णधार कोण असेल?विराट आणि रोहित टी-२० वर्ल्डकप खेळणार का? जर हे दोघेही खेळ असतील तर डावाची सुरुवात कोण करणार हे भारतीय संघासमोर असलेले काही प्रश्न आहेत.

रोहित- विराट टी-२० वर्ल्डकप खेळणार का?

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहेत. वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर हे दोघेही खेळाडू टी-२० क्रिकेटमधून ब्रेक घेणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र रोहित आणि विराटने अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरुन असं दिसून येत आहे की विराट आणि रोहित हे दोघेही टी-२० वर्ल्डकप खेळताना दिसून येउ शकतात. हे दोन्ही खेळाडू आल्याने संघात अनुभवी खेळाडूंची भर पडेल.

डावाची सुरुवात कोण करणार?

टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेतील पराभवानंतर रोहित आणि विराट टी-२० क्रिकेटपासून दुर होते. संघ व्यवस्थापकांनी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यावर अधिक भर दिला. टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्यावर होती.दोघांनी अनेकदा संघाला चांगली सुरुवात करुन देत विजय मिळवून दिला. दरम्यान रोहित शर्माचं कमबॅक झाल्यानंतर गिल किंवा जयस्वालपैकी एकाला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागणार आहे. (Latest sports updates)

रोहितसोबत कोण करणार डावाची सुरुवात?

रोहित शर्मा जर टी -२० वर्ल्डकप खेळणार असेल तर तो डावाची सुरुवात करताना दिसून येईल. त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे दोन पर्याय असतील. गिलने टी -२० क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे. तसेच यशस्वी जयस्वालपेक्षा गिल जास्त अनुभवी आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत गिल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT