IPL 2025 च्या क्वालिफायर २ सामन्यामध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर मात करत फायनलमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. कर्णधार श्रेयस अय्यरने पंजाबला एकहाती विजय मिळवून दिली. त्याने ४१ चेंडूत ८७ धावांची शानदार खेळी केली. पण तरीही श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. पंजाबच्या कर्णधारावर बीसीसीआयने कारवाई का केली? चला जाणून घेऊयात...
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे श्रेयस अय्यरवर कारवाई झाली आहे. आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने श्रेयसला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय पंजाब किंग्सच्या प्लेईंग ११ मधील उर्वरित सदस्यांना (इम्पॅक्ट प्लेयरसह) ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम यांपैकी जे कमी असेल, ते दंड म्हणून आकारले जाणार आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे पंजाबसह मुंबईच्या कर्णधारावरही कारवाई झाली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटमुळे ३० लाख रुपये दंड म्हणून भरावे लागणार आहे. मुंबईच्या संघातील इतर खेळाडूंसह इम्पॅक्ट प्लेअरला १२ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम यांपैकी जे कमी असेल ते दंड स्वरुपात आकारले जाणार आहे.
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही लढत पाहायला मिळाली होती. यात बंगळुरूचा संघ पंजाबवर वरचढ ठरला होता. त्यानंतर पंजाबने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केले. आता पंजाब विरुद्ध बंगळुरू ही लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या दोन संघांपैकी जो संघ विजयी होईल, तो आयपीएल २०२५ चा विजेता बनेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.