Longest Six In ODI World Cup 2023 Twitter
Sports

Shreyas Iyer Longest Six: एकच मारला कडक मारला! लोकल बॉय श्रेयस अय्यरने मारला WC 2023 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार

Longest Six In ODI World Cup 2023: श्रेयस अय्यरने या सामन्यात १०६ मीटर लांब षटकार मारला आहे.

Ankush Dhavre

Shreyas Iyer Longest Six In World Cup 2023:

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ व्या सामन्याचा थरार सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला.

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. दरम्यान या डावात भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

श्रेयस अय्यरने मारला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात लांब षटकार..

तर झाले असे की, शुभमन गिल ९२ धावांवर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी ३६ वे षटक टाकण्यासाठी कसून रजिता गोलंदाजीला आला होता.

या षटकातील चौथ्या चेडूंवर श्रेयस अय्यरने जागेवरुन ऑन साईडच्या दिशेने १०६ मीटर लांब षटकार मारला आहे. हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने १०४ मीटर लांब षटकार मारला आहे.

तर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरच्या षटकाराची नोंद आहे. श्रेयस अय्यरने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात १०१ मीटर लांब षटकार मारला आहे. (Latest sports updates)

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज

श्रेयस अय्यर -१०६ मीटर

ग्लेन मॅक्सवेल- १०४ मीटर

श्रेयस अय्यर- १०१ मीटर

फखर जमान- ९९ मीटर

डेव्हिड वॉर्नर- ९८ मीटर

विराट अन् गिलचं शतक हुकलं..

या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज शुभमन गिल आणि विराट कोहलीला शतक पूर्ण करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र ही संधी हुकली आहे. शतकाच्या अगदी जवळ असताना दोघेही फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत. या सामन्यात विराट कोहली ९४ चेडूंचा सामना करत ८८ धावांची खेळी करत माघारी परतला. तर शुभमन गिल ९२ चेंडूंचा सामना करत ९२ धावांची खेळी करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT