rohit sharma  saam tv news
Sports

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा पत्ता कट होणार? रोहितकडे या खेळाडूला स्थान देण्याशिवाय पर्यायच नाही

Shreyas Iyer Flop Show: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर फ्लॉप ठरला आहे.

Ankush Dhavre

India vs England 1st Test:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी क्रिकेटमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचं दिसून येत आहे. गेल्या १० डावात त्याला ४० धावांचा आकडा देखील पार करता आलेला नाही. असं असूनही त्याला सातत्याने संघात संधी दिली जात आहे. मात्र तो संधीचं सोनं करू शकलेला नाही. त्याच्या फ्लॉप शो पाहून त्याच्या संघातील स्थानावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

श्रेयस अय्यर वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये हिट ठरतोय. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला मध्यक्रमात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो ६३' चेंडूत अवघ्या ३५ धावा करत माघारी परतला आहे. त्याला रेहान अहमदने बाद करत माघारी धाडलं आहे. या सामन्यात त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली होती. मात्र तो कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवू शकलेला नाही.

अजिंक्य रहाणेचं कमबॅक होणार?

श्रेयस अय्यर गेल्या १० डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने २९,४,१२,०, २६,३१,६,०,४ आणि ३५ धावांची खेळी केली आहे. त्याचा रेकॉर्ड पाहिला तर तो ४० धावांचा आकडा देखील पार करू शकलेला नाही. (Cricket news in marathi)

तर दुसरीकडे अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये झालेल्या वेस्टइंडीज दौऱ्यावर तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेर केलं गेलं. अजिंक्य रहाणे अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे जर श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करू शकत नसेल तर अजिंक्य रहाणेला संघात स्थान दिले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT