पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली. (IPL/X) saam tv
Sports

Shreyas Iyer Fined : गुजरातला लोळवलं, पण एक चूक महागात पडली; पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठी कारवाई

shreyas iyer fined slow over rate punjab kings vs gujarat titans ipl : गुजरात टायटन्सला पहिल्याच सामन्यात पराभूत करणाऱ्या पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात केलेली एक चूक अय्यरला महागात पडली. तब्बल १२ लाख रुपयांचा दंड त्याला आकारला आहे.

Nandkumar Joshi

यंदाच्या आयपीएलमध्ये बीसीसीआयनं पहिलीच मोठी कारवाई केली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरवर ही कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुजरातला पराभूत करणाऱ्या पंजाब किंग्जच्या कर्णधाराची एक चूक महागात पडली. या एका चुकीसाठी त्याला लाखो रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघानं काल, मंगळवारी गुजरात टायटन्सला पराभूत केलं. पण श्रेयस अय्यर एका चुकीमुळं अडचणीत सापडला. पंजाब किंग्जला स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी ठरवण्यात आलं. आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं असून, आयपीएलचे आयोजक असलेल्या बीसीसीआयनं संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरवर कारवाई केली आहे.

आयपीएलच्या माहितीनुसार, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. न्यू चंदीगडच्या न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलमधील चौथा सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्ज स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळला. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल २.२२ अंतर्गत पंजाब किंग्ज संघाने उल्लंघन केलं आहे. त्यामुळं बीसीसीआयने कर्णधार श्रेयस अय्यरवर १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

पंजाब किंग्ज संघानं गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरचं षटक वेळेत टाकलं नाही. यावर त्यांना पहिली पॅनल्टी लावण्यात आली. एका क्षेत्ररक्षकाला सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलं नव्हतं. पाचऐवजी चार खेळाडूंना सीमारेषेवर ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर स्लो ओव्हर रेटप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.

आता पुन्हा संघानं अशा प्रकारे उल्लंघन केले आणि त्यात दोषी आढलले तर संपूर्ण संघाच्या सामन्याचे मानधन कपात करण्यात येईल. तर श्रेयस अय्यरला दुप्पट दंड भरावा लागेल. तीन वेळा स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT