Shreyas Iyer Twitter
Sports

Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

Shreyas Iyer Injury Update: आयपीएल तोंडावर असताना श्रेएस अय्यरने मोठा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतुन बाहेर झालेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआयने आणि एनसीएने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र श्रेयसने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे.

भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. त्यानंतर वनडे मालिकेतूनही त्याला बाहेर व्हावे लागले होते. पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेला श्रेयस अय्यर आगामी आयपीएल स्पर्धेतील सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. (Latest sports upates)

तसेच तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही खेळताना दिसून येणाची शक्यता खूप कमी आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरने शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उपचाराबाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तो काही दिवस विश्रांती आणि पुनर्वसन करणार आहे.

शस्त्रक्रिया केल्यास तो कमीत कमी ६ महिने तरी संघाबाहेर राहू शकतो. त्यामुळे त्याचे वनडे विश्वचषक खेळणे कठीण होऊन जाईल. वनडे वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात भारतात पार पडणार आहे.

श्रेयस अय्यरला आयपीएल खेळण्यापेक्षा वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला इतके महिने क्रिकेटपासून दूर राहायचं नाहीये. त्यामुळे तो शस्त्रक्रिया करण्यास नकार देत आहे.

तर एनसीएचे म्हणणे आहे की, खेळाडूला स्वतः हे पाहावं लागेल की, अशा परिस्थितीत दुखापत शास्त्रक्रियेशिवाय बरी होऊ शकते का.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'त्यांना काही काम नसतं, फक्त..' सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेक श्रिया काय म्हणाली?

Makyachi Bhakri Recipe : जेवणासाठी खास बनवा मऊ अन् पौष्टिक मक्याची भाकरी, वाचा गावरान रेसिपी

Parenting Tips: मुलांसमोर कधीही करू नका या चुका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: बीडच्या नारायण गड येथील दसरा मेळाव्याचे बॅनर

Actor Death Mystery : कॉल बॉयशी शरीरसंबंध, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.. नंतर जमिनीत आढळला अभिनेत्याचा मृतदेह

SCROLL FOR NEXT