Shreyas Iyer Fitness Update  Saam TV
Sports

Shreyas Iyer Injury: आनंदाची बातमी! Shreyas Iyer च्या पाठीची शस्त्रक्रिया यशस्वी, मैदानावर केव्हा करणार कमबॅक? वाचा

Shreyas Iyer Injury Update: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे.

Ankush Dhavre

Shreyas Iyer: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याच्या पाठीच्या दुखण्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मात्र त्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

श्रेयस अय्यरला पूर्णपणे फिट होण्यासाठी कमीत कमी ३ महीने लागू शकतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ जून रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर याच वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या श्रेयस अय्यरने बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत पुनरागमन केले होते. मात्र त्याची दुखापत वाढल्याने त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

श्रेयसला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते. त्यामुळे त्याने शस्त्रक्रियेसाठी नकार दिला होता. मात्र दुखापत वाढल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. (Latest sports updates)

यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, श्रेयस अय्यर आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.

मात्र दुखापत वाढत असल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यर ऐवजी नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करतोय.

श्रेयस अय्यरच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये ४१.६ च्या सरासरीने ६६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT