Shreyas iyer and surykumar yadav may not get selected in team india for odi series against australia  SAAM TV
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून टीम इंडियाचे २ हुकमी एक्के पडणार बाहेर? मोठी माहिती आली समोर

India vs Australia ODI Series: भारतीय संघातील २ प्रमुख खेळाडूंबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

India vs Australia ODI Series:

भारतीय संघाने नुकताच संपन्न झालेल्या आशिया चषक २०२३ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. आता भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष वनडे वर्ल्डकपवर असणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

ही मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि दुखापतग्रस्त असलेल्या श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

दुखापतीतून कमबॅक करत असलेल्या श्रेयस अय्यरला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान दिले गेले होते. साखळी फेरीत पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला संधी दिली गेली होती.

मात्र या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. वर्ल्डकप स्पर्धेत श्रेयस अय्यरचं खेळणं हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

एका सुत्राने गोपनियता टिकवून ठेवण्याच्या अटिवर सांगितले की, 'ही मालिका त्याच्यासाठी (श्रेयस अय्यर) अतिशय महत्वाची असणार आहे. या मालिकेत त्याला फलंदाजी आणि पू्र्णवेळ मैदानात क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. दुखापतीतून कमबॅक केल्यानंतर तो जास्त वेळ फलंदाजी करू शकलेला नाही. त्याची प्रगती चांगली आहे. मात्र असं जाणवतंय की, टीम मॅनेजमेंट कुठलीही घाई करण्याच्या विचारात नाही.' (Latest sports updates)

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये दमदार खेळ करत वनडे संघात स्थान मिळवलं आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. बांगलादेशविरूद्ध तो फलंदाजीला देखील आला होता. मात्र या डावात तो २६ धावा करत माघारी परतला होता.

ज्या पद्धतीने तो बाद झाला होता. त्यावरून टीम मॅनेजमेंट देखील नाराज असल्याचं दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या मालिकेसाठी या दोघांना संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT