Sri Lanka cricket controversy SAAM TV
Sports

Cricket controversy: धक्कादायक! आंघोळ करताना महिलांचे व्हिडीओ काढले, दोन खेळाडूंना अटक; क्रिकेट विश्व हादरले

Sri Lanka cricket controversy: श्रीलंकेच्या अंडर १९ संघातील दोन खेळाडूंना हॉटेलमध्ये महिलांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

श्रीलंकेच्या क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलिसांनी श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघातील दोन खेळाडूंना अटक केली आहे. ही घटना कोलंबोच्या नाराहेनपिटा परिसरात घडल्याची माहिती आहे. खेळाडूंनी हे व्हिडिओ ऑनलाइन शेअर किंवा अपलोड केले आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत.

श्रीलंकेची अंडर १९ ची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे एक मेडिकल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी अनेक महिला डॉक्टर उपस्थित होत्या. या महिला डॉक्टरांनी तक्रार केली, की त्या अंघोळ करत असताना कोणीतरी मोबाईल फोन वापरून त्यांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केले. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना आढळून आले की, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यांपैकी दोघे १९ वर्षांखालील टीममधील क्रिकेटपटू होते.

खेळाडूंना मिळाला जामीन

नाराहेनपिता पोलिसांनी दोन्ही तरुण क्रिकेटपटूंना अटक केली आहे. यावेळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्येकी ५,००,००० श्रीलंकन रुपये भरल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. क्रिकेटपटूंनी महिलांच्या आंघोळीचे काढलेले व्हिडिओ कोणत्याही वेबसाइटवर अपलोड केले आहेत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे इतरांसोबत शेअर केले आहेत का, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मे रोजी होणार आहे. या प्रकरणी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्याचप्रमाणे या दोन्ही खेळाडूंविरुद्ध कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. बोर्ड कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहत असल्याचं मानलं जात आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डात काही दिवसांपूर्वीच अध्यक्ष शम्मी सिल्वा आणि संपूर्ण कार्यकारी समितीने राजीनामा दिला. सरकारने आता एक नवीन समिती स्थापन केली आहे, ज्यात कुमार संगकाराचा समावेश आहे. श्रीलंकन क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीसमोर हे प्रकरण उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT