Shoaib Akhtar World Cup Prediction saam tv
Sports

World Cup 2023: शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी! एका शब्दात सांगितलं कोण उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी

Shoaib Akhtar World Cup Prediction: शोएब अख्तरने वर्ल्डकपबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

Shoaib Akhtar World Cup Winner Prediction:

आगामी वनडे वर्ल्डकप सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना येत्या ५ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. तर भारतीय संघ आपल्या मिशन वर्ल्डकपची सुरूवात ८ ऑक्टोबरपासून करणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी विजेता संघ आणि अंतिम ४ मध्ये जाणाऱ्या संघाची भविष्यवाणी करायला सुरूवात केली आहे.

आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने देखील कोणता संघ विजयी होणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

शोएब अख्तरने म्हटले की, वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानला ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. पाकिस्तानच्या विजयामुळे आर्थिक समस्येने त्रस्त असलेल्या देशवासियांना जल्लोष साजरा करण्याची संधी मिळेल.

भारतात खेळताना पाकिस्तानचा संघ एकटा पडेल. त्यांच्यावर कुठलाच दबाव नसेल. यजमान भारतीय संघावर आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळण्याचा दबाव असेल. त्यामुळे आम्ही चांगलं खेळू.

कोणता संघ उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी?

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, सर्व स्टेडियम गच्च भरलेले असतील. २ अरबपेक्षाही जास्त लोकं ही स्पर्धा TV किंवा सोशल मीडियावर लाईव्ह पाहतील. भारतातील माध्यमं देखील पाकिस्तानवर तितकाच दबाव टाकतील आणि हा सामना महायुद्धाचं स्वरूप धारण करेल.

अनेकांनी तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला विजेता घोषित केलं आहे. याचा दबाव भारतीय संघावर असणार आहे.

सध्या भारतीय संघ आशिया चषक खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय संघाचा पुढील सामना १० सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ पु्न्हा एकदा १७ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळण्यासाठी आमने सामने येऊ शकतात. मात्र अजुनही भारतीय संघाची प्लेइंग ११ ठरलेली नाही. असं वक्तव्य शोएब अख्तरने केले आहे. (Latest sports updates)

याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, गेल्या २ वर्षात भारतीय संघाला आपली प्लेइंग ११ निवडता आलेली नाही. ही खुप विचार करण्यासाठी गोष्ट आहे. चौथा क्रमांकावर कोण खेळणार हे माहीत नाही. विराट तिसऱ्यावर येणार की पाचव्या क्रमांकावर हे माहीत नाही. ईशान किशन कुठेही खेळू शकतो.

वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आलं नाहीये. चहलबाबत बोलताना तो म्हणाला की, चहलला का नाही घेतलं हे मला समजून आलेलं नाही. १५-२०० वर ऑलआउट झाल्यावर भारतीय संघात फलंदाज वाढवले जातात.

मात्र गोलंदाज वाढवले जात नाहीत. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज ठेवण्यात काय अर्थ आहे. जर टॉप ५ फलंदाज काही करू शकले नाही, तर आठव्या क्रमांकाचे फलंदाज काय करणार आहेत. असं शोएब अख्तर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT