Virat Kohli Record Update/ File Photo saam tv
Sports

Virat Kohli: 'लोकं म्हणतात तू विराटचं इतकं कौतुक का करतो..?' पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने दिलं मन जिंकणारं उत्तर

विराट कोहली सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे.

Ankush Dhavre

Shoaib akhtar on virat kohli:भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये.

मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Latest sports updates)

सुनो न्यूजवर बोलताना शोएब अख्तरने म्हटले की, 'मी त्याचं कौतुक का करू नको, जेव्हा तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता त्यावेळी मी माझ्या मित्राला म्हटले होते की, तो डोक्याचा वापर करून खेळेल तर यशस्वी होईल.असच झालं विराटने टी-२० क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'धावांचा पाठलाग करताना विराटने ४० शतके झळकावली आहेत. असं असतानाही तुम्ही म्हणता की, मी विराटाचे कौतुक करतो. माझं उत्तर हेच असतं की, मी का नको करू त्याचं कौतुक. एकवेळ अशी होती जेव्हा विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघ सामना जिंकायचा. टी -२० वर्ल्ड कप पासून त्याने धावा केल्या आहेत. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये तो शतक झळकावू शकला नाहीये.'

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ठरलाय फ्लॉप...

विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये धावा करताना संघर्ष करताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या मालिकेत त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. शतक सोडा तो अर्धशतक देखील झळकावू शकला नाहीये.

विराटने शेवटचे शतक २०१९ मधे बांगलादेश संघाविरुध्द झळकावले होते. त्यानंतर तब्बल ३ वर्षे होऊन गेले आहेत, त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT