Shlok Ghorpade, Mrf Mogrip Supercross Championship 2022 saam tv
क्रीडा

MRF Mogrip Supercross Championship 2022: एमआरएफ मोग्रिप सुपरक्रॉस स्पर्धेत साता-याचा श्लोक घोरपडे चमकला

श्लोकने यापुर्वी अनेक स्पर्धेत उज्जवल कामगिरी केली आहे.

Siddharth Latkar

MRF Mogrip Supercross Championship 2022 : गोवा येथे नुकत्याच झालेल्या एम.आर.एफ मोग्रीप सुपरक्रॉस राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत साता-याच्या श्लोक विक्रम घोरपडे (sholk ghorpade) याने विजेतेपद पटकाविले. श्लोकने यापुर्वी अनेक स्पर्धेत उज्जवल कामगिरी केली आहे. आता बंगळूर येथे हाेणा-या स्पर्धेत ताे आपले काैशल्यपणास लावणार आहे.

ही स्पर्धा सोळा वर्षाखालील गटाची हाेती. सुपर क्रॉस स्पर्धेत श्लाेक याने (के एक्स 150cc ची) बाईक चालवून एक वेगळाच थरार निर्माण केला. प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर झळकला तर इंडियन एक्सपर्ट्स आणि ओपन फॉरेन कॅटेगरीमध्ये त्याने चौथा क्रमांक मिळवला. (Maharashtra News)

आतापर्यंत या वर्षात श्लोकने नाशिक, पुणे , कोईंमतुर, बडोदा आणि गोवा येथे अतिशय सुरेख कामगिरी करत सोळा वर्षाखालील गटामध्ये पाचही राऊंडमध्ये विजेतेपद कायम ठेवले. या स्पर्धेचा शेवटचा सहावा राऊंड लवकरच बंगळूर येथे होणार आहे. श्लोक हा येथील (satara) के.एस.डी. शानभाग विद्यालयाचा (ksd shanbhag vidyalaya) विद्यार्थी आहे. ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग यांच्यासह आदींनी त्याचे अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT