shivam dube  saam tv
क्रीडा

Shivam Dube: टीम इंडियाला 'युवराज' मिळालाय! कामगिरी पाहून म्हणाल, तूच रे भावा..

Ankush Dhavre

IPL 2023 Emerging Player: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या.

या धावांचा बचाव करताना चेन्नई सूपर किंग्ज संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि संघाला २७ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे.

दरम्यान चेन्नईला टॉप २ मध्ये पोहचवण्यात अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने मोलाचे योगदान दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात शिवम दुबे वर बोली लावली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिले. स्टेप आउट न होता जागेवरूनच गगनचुंबी षटकार मारणं आणि मध्यमगती गोलंदाजी करणं ही शिवम दुबेची ओळख आहे.

यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्याला या संघासाठी हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र चेन्नई संघात पदार्पण केलं आणि नशीबच उजळलं. (Latest sports updates)

फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक षटकार..

आयपीएल २०२३ स्पर्धेत शिवम दुबेने आपल्या मनगटात किती ताकद आहे हे दाखवून दिले आहे. त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना १६ षटकार मारले आहेत. तर १४ षटकार मारणारा संजू सॅमसन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने १३ षटकार मारले आहेत.

शिवम दुबेच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने सरासरी ११ चेंडू खेळल्यानंतर १ षटकार मारला आहे. तसेच त्याच्या फलंदाजीतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी ११ सामने खेळताना त्याने ३ अर्धशतकांच्या साहाय्याने ३१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २७ षटकार खेचले आहेत.

आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची फलंदाजी करण्याची शैली ही माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग सारखी आहे.

युवराज सिंग देखील स्टेप आउट न होता चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा. त्याचप्रकारे शिवम दुबे देखील क्रीझवर उभा राहून षटकार मारण्याचा दम खम ठेवतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT