CSK vs DC Match Result: चेपॉकवर CSK च किंग! धोनीची आक्रमक फलंदाजी अन् पथिरानाची अप्रतिम गोलंदाजी; दिल्लीवर मिळवला दणदणीत विजय

CSK vs DC Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला
CSK VS DC
CSK VS DCSaam tv

CSK VS DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी करत २७ धावांनी विजय मिळवला आहे.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघ १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर पराभूत झालेला दिल्लीचा संघ १० व्या स्थानी आहे.

या पराभवासह दिल्लीच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.

CSK VS DC
IPL 2023 Cheerleaders: आता तर हद्दच पार! सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने चियर लीडर सोबत केलं लाजिरवाणं कृत्य ; VIDEO व्हायरल

चेन्नईने केल्या १६७ धावा..

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने १८ धावांचे योगदान दिले. तसेच अंबाती रायुडूने १७ चेंडूंचा सामना करत २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १६७ धावा केल्या होत्या.

दिल्लीचे फलंदाज ठरले फ्लॉप..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवण्यासाठी १६८ धावांची गरज होती. आव्हान तसं सोपं होतं. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत देखील मिळत होती. मात्र दिल्लीचे फलंदाज धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून रायले रुसोने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर मनीष पांडेने २७ धावांचे योगदान दिले. शेवटी अक्षर पटेलने किल्ला लढवत २१ धावांची खेळी केली. मात्र दिल्लीचा संघ हा सामना जिंकण्यापासून २७ धावा दूर राहिला. (Latest sports updates)

CSK VS DC
Suryakumar Yadav Mr. 360: एकच वादा सूर्या दादा.. मिस्टर 360 च्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

दिल्ली कॅपिटल्स:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रायली रुसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com