team india, shivam dube google
Sports

Shivam Dube: संधी मिळूनही टीम इंडियाचा हा स्टार ठरतोय फ्लॉप; स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी

IND vs USA, Shivam Dube: टी-२० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही.

Ankush Dhavre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. १२ जून रोजी भारतीय संघाचा तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ कांऊटी स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट सुपर ८ मध्ये प्रवेश करणार आहे. यापू्र्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शिवम दुबेला संधी दिली गेली होती. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो सुपरफ्लॉप ठरला आहे.

शिवम दुबेने आयपीएल २०२४ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शानदार कामगिरी केली होती. याच कामगिरीची दखल घेत त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र तो या संधीचा त्याला फायदा घेता आलेला नाही. त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तो २ चेंडूंचा सामना करुन खातंही न ऊघडता माघारी परतला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो ९ चेंडूंत ३ धावा करत माघारी परतला.

शिवम दुबेने आयपीएल २०२४ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना मध्यक्रमात फलंदाजीला यायचा. यादरम्यान त्याने १४ सामन्यांमध्ये ३९६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १६० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. शिवम दुबेचं फॉर्ममध्ये येणं हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे.

कारण भारतीय संघाने त्याला फिनिशर म्हणून संघात स्थान दिलं आहे. मैदान कितीही मोठं असलं, तर तरीही त्याच्याकडे चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याची क्षमता आहे. त्याने यापूर्वीही शेवटी येऊन संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे शिवम दुबेचं फॉर्ममध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT