shikhar dhawan statement after defeat against sunrisers hyderabad in pbks vs srh match amd2000 twitter/IPL
क्रीडा

Shikhar Dhawan Statement: 'इथेच आमची चुक झाली..', सामन्यानंतर शिखर धवनने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Ankush Dhavre

Shikhar Dhawan Statement After Defeat Against SRH:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २३ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात निकाल लागला आणि अटीतटीच्या लढतीत हैदराबादने २ धावांनी हा सामना जिंकला. विजयाच्या अगदी जवळ असताना पंजाब किंग्ज संघाला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शिखर धवन नाराज असल्याचं दिसून आलं. यासह त्याने सामन्यातील चुका सांगत शशांक आणि आशुतोषचं कौतुकही केलं.

या सामन्यानंतर बोलताना शिखर धवन म्हणाला की, ' मला वाटतं, शशांक आणि आशुतोषने शानदार फलंदाजी केली. आम्ही त्यांना आव्हानात्मक धावसंख्येवर रोखलं होतं. मात्र सुरुवातीच्या ६ षटकात आम्हाला हवी तशी खेळी करता आली नाही. सुरुवातीलाच आमचे ३ फलंदाज बाद झाले. इथेच आम्ही बॅकफूटवर गेलो. शेवटी आम्ही एक झेल सोडला. आम्ही त्यांना आणखी कमी धावांवर रोखू शकलो असतो. मात्र फलंदाजांनी आम्हाला निराश केलं.'

सामना गमावला असला तरीदेखील शशांक आणि आशुतोषने या सामन्यातही शानदार फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. कर्णधार शिखर धवनने सामन्यानंतर त्यांचं कौतुकही केलं. तो म्हणाला की, ' युवा खेळाडूंना अशाप्रकारे सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहून खूप बरं वाटतं. आम्हाला आशा होती की, ते सामना जिंकून देतील. मात्र त्यांनी विजयाच्या अगदी जवळ नेलं. यामुळे येणाऱ्या पुढील सामन्यांमध्ये आमचा आत्मविश्वास नक्की वाढणार आहे. यापुढे आम्हाला आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.' या सामन्यात फलंदाजी करताना शशांक सिंगने २५ चेंडूंचा सामना करत ४६ धावांची खेळी केली. तर आशुतोष शर्माने १५ चेंडूंचा सामना करत ३३ धावा धावांची तुफानी खेळी केली. (Cricket news in marathi)

पंजाबचा २ धावांनी पराभव..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून नितीश कुमार रेड्डीने ३७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला २० षटकअखेर १८० धावा करता आल्या. पंजाब किंग्ज संघाला हा सामना २ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT