अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी २०० धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जकडून शशांक सिंगने सर्वाधिक ६१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयानंतर शशांक सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुजरातने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. शिखर धवन १ तर जॉनी बेअरस्टो अवघ्या २२ धावा करत तबूंत परतले. गुजरातचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. त्यावेळी शशांक सिंग फलंदाजीला आला आणि अवघ्या २९ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. (Cricket news in marathi)
पंजाब किंग्ज संघाचं हे चुकलंच...
शशांक सिंगने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं आयपीएल स्पर्धेच्या कारकिर्दीतील पहिलंच अर्धशतक ठरलं. ज्यावेळी त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं त्यावेळी पंजाबला विजयासाटी १४ चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज होती. पंजाबचा संघ ज्या परिस्थितीत होता, त्या परिस्थितीतून बाहेर काढत त्याने संघाला विजयापर्यंत पोहचवलं. शशांकने अर्धशतकी खेळीनंतर जास्त सेलिब्रेशन केलं नाही, कारण त्याला माहित होतं की त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही.
मात्र जेव्हा डगआऊटकडे कॅमेरा फिरला त्यावेळी संघातील एकही खेळाडू त्याचं कौतुक करताना दिसून आला नाही. कर्णधार शिखर धवनच्या चेहऱ्यावरही कुठलेच हावभाव नव्हते. पंजाब किंग्ज संघातील डगआऊटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच नेटकरीही नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.