SHIKHAR DHAWAN TWITTER
Sports

Shikhar Dhawan Retirement: शिखर धवनने निवृत्ती घेतली, मग IPL खेळणार की नाही? जाणून घ्या Inside Story

Will Shikhar Dhawan Play IPL: शिखर धवनने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तो आयपीएल खेळणार की नाही? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनचे बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघात कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी संघात एन्ट्री केल्यानंतर शिखर धवनला संधी मिळणं कमी झालं. त्यानंतर काही मालिकांमध्ये फ्लॉप राहिल्यानंतर त्याला संघाबाहेर पडावं लागलं.

दरम्यान संघात कमबॅक करण्याची संधी मिळत नसल्याने त्याला निवृत्ती जाहीर करावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर शिखर धवन आयपीएल खेळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या शिखर धवनला फेअरवेल सामनाही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने संघात कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र संधी मिळत नसल्याने त्याने आंतरराष्ट्रीय आणि डॉमेस्टीक क्रिकेटलाही रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल खेळणार का?

शिखर धवन आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाकडून खेळतो. आयपीएल २०२४ स्पर्धेतही तो या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर त्याला दुखापतीमुळे पुढील सामने खेळता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत सॅम करन संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्जला ४ खेळाडू रिटेन करायचे आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र पंजाबकडूनच खेळणार याची शक्यता खूप कमी आहे. कारण शिखर धवन आयपीएलच्या १ किंवा २ हंगामात खेळताना दिसून येऊ शकतो.त्यामुळे पंजाबचा संघ त्याला रिटेन करण्याची शक्यता खूप कमी आहे. तो जर लिलावात आला, तर अनुभवी सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

आयपीएल कारकिर्द

शिखर धवनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर या गेल्या हंगामात त्याला १० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने ३२० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली होती.

त्याच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या २१७ सामन्यांमध्ये ६७२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ५० अर्धशतकं झळकावली आहेत. नाबाद १०६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

या संघांचं केलंय प्रतिनिधित्व

दिल्ली डेअरडेव्हिल्स( दिल्ली कॅपिटल्स)- २००८-२०१०

डेक्कन चार्जर्स- २०११-२०१२

सनरायझर्स हैदराबाद - २०१३-२०१८

दिल्ली कॅपिटल्स - २०१९-२०२१

पंजाब किंग्ज - २०२२ ते आतापर्यंत

व्हिडिओ शेअर करत घेतली निवृत्ती

शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला,' माझं कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक, माझा संघ आणि मला ज्यांच्यासोबत इतके वर्ष क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. या प्रवासात ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांचा मी आभारी आहे . मला कुटुंब,मला नाव मिळालं आणि यासह तुम्हा सर्वांचं प्रेमही मिळालं. पण पुढे जाण्यासाठी पाने उलटणे आवश्यक आहे आणि मी तेच करतोय. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT