भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन यापुढे भारतीय संघाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय आणि डॉमेस्टिक क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे रेकॉर्डस आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत होता.
त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय आणि डॉमेस्टिक क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या मैदानावर गब्बर म्हणून ओळखल्या जाणारा शिखर धवन लक्झरी आयुष्य जगतो. दरम्यान जाणून घ्या त्याचं नेटवर्थ आणि कार कलेक्शन.
आयपीएल २०२४ स्पर्धेत शिखर धवन पंजाब किंग्जकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आयपीएल स्पर्धेत त्याला ८.५ कोटी रुपये मानधन म्हणून दिले जायचे.
शिखर धवन दिल्लीत राहतो. दिल्लीत त्याचं आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास ६ कोटी रुपये इतकी आहे. यासह इतर शहरांमध्येही त्याची घरं आहेत.
शिखर धवनच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या कार आहेत. त्याच्याकडे ऑडी ए६ , रेंज रोवर स्पोर्ट्स बीएमडब्ल्यू ६ जीटी आणि १ कोटी किंमत असलेली मर्सिडीज कार देखील आहे.
आयपीएलमधून कमाई करण्यासह धवनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचेही पैसे मिळतात. यासह तो जाहिरातीतूनही कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
शिखर धवन १४ मिलियन डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. भारतीय चलनानुसार त्याची नेटवर्थ ही १०५ कोटींच्या घरात आहे. तो महिन्याला ६० लाख तर वर्षाला ८ कोटींपेक्षा अधिकची कमाई करतो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.