shikhar dhawan saam tv
Sports

Shikhar Dhawan Retirement: स्टाईलमुळे नव्हे, तर या कारणामुळे शिखरला 'गब्बर' नाव पडलं! वाचा हटके स्टोरी

Why Shikhar Dhawan Called As Gabbar: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि डॉमेस्टिक क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्याला गब्बर का म्हणतात? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) अखेर क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या स्पर्धेतील हिरो ठरलेल्या शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली.

त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. जेव्हा जेव्हा शिखर धवन शतक झळकवायचा किंवा झेल टिपायचा त्यावेळी तो मिश्यांना ताव देत मांडी ठोकायचा. त्याला क्रिकेटचा गब्बर असेही म्हटले जाते. त्याला हे नाव का पडलं? जाणून घ्या यामागची हटके स्टोरी. (Shikhar Dhawan Retirement)

क्रिकेटचा गब्बर (Gabbar) म्हटलं की, शिखर धवन आठवतो. शतक झळकावताच त्याचं ते हटके सेलिब्रेशन आठवतं. शिखर धवनने एका कार्यक्रमात यामागचा किस्सा सांगितला होता. यामागची गोष्ट अशी की, एका रणजी सामन्यानंतर शिखर धवन सिली पॉईंटला क्षेत्ररक्षण करत होता.

त्यावेळी विरोधी संघातील फलंदाजी जोडी चांगलीच सेट झाली होती. दिल्लीच्या खेळाडूंना घाम फुटला होता. आपल्या संघाचा उत्साह वाढायला हवा, त्यासाठी काहीतरी करायला हवं, असं शिखरला सुचलं. कारण सुस्त पडलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी हाच एक पर्याय होता.

म्हणून शिखरला गब्बर म्हणतात

संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, शिखर धवन शोले चित्रपटातील गब्बरचा डायलॉग म्हणू लागला. या डायलॉगमुळे सुस्त पडलेल्यक खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यामुळे संघातील खेळाडू पुन्हा एकदा त्याच जोशात गोलंदाजी करू लागले. गब्बर हे नाव त्याला सूट करतं कारण तो मैदानावर तो गब्बर सारखाच रुबाबात खेळायचा.

हटके सेलिब्रेशनमुळे चर्चेत

शिखर धवन आपल्या फलंदाजीसह आपल्या स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतो. झेल टिपल्यानंतर तो अनेकदा मांडी ठोकून सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. त्याने यामागचं कारणही सांगितलंय. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता की, त्याला कबड्डी खेळायला खूप आवडतं.

अशी राहिली कारकीर्द

शिखर धवनने भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. त्याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आपल्या कारकीर्दीत ३४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला २३१५ धावा करता आल्या. तर वनडे कारकिर्दीतील १६७ सामन्यांमध्ये त्याला ६७९३ धावा करता आल्या आहेत. तर टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६८ सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT