IND VS AUS 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत २-० ची आघाडी घेतली आहे.
तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १ मार्चपासून इंदोरच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे. यासह आणखी एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. (Latest Sports Updates)
इंदोर कसोटी जिंकताच भारतीय संघाच्या नावे होणार मोठा विक्रम
इंदोर कसोटी सामना हा भारतीय संघासाठी (Team India) अतिशय महत्वाचा असणार आहे. हा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
तसेच हा सामना जिंकताच भारतीय संघ ही मालिका देखील आपल्या खिशात घालणार आहे. तसेच ही मायदेशात जिंकलेली सलग १६ वी कसोटी मालिका ठरणार आहे.
सध्या भारतीय संघाच्या नावे मायदेशात सलग १५ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम आहे. मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याच्या विक्रमात दुसरा कुठला संघ भारतीय संघाच्या आसपासही नाहीये.
भारतीय संघ मायदेशात खेळताना सर्वात मजबूत संघ आहे. गेल्या ४४ कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाने केवळ २ मालिका गमावल्या आहेत. २०१२ मध्ये इंग्लंडविरुध्दची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावली नाहीये.
मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमात ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया संघाने २ वेळेस सलग १० कसोटी जिंकण्याचा विक्रम केला होता.
२०१३ पासून भारतीय संघाची मायदेशातील कामगिरी
सामने -४४
विजय -३६
पराभव -२
ड्रॉ - ६
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.