shefali verma twitter/bcci
Sports

IND-W vs SA-W: शेफाली वर्माने रचला इतिहास! लागोपाठ षटकार खेचत ठोकली कसोटीतील सर्वात जलद डबल सेंच्युरी - VIDEO

Shefali Verma Double Century: शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी शेफाली वर्माने दुहेरी शतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर एकमात्र कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारताची युवा स्टार फलंदाज शेफाली वर्माने महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे.

शेफाली वर्माचं दुहेरी शतक

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शेफाली वर्मा आणि स्म्रिती मंधानाने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघींनी मिळून शतकं झळकावली आणि २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. दरम्यान १५० धावांच्या जवळ असताना स्म्रिती मंधाना बाद होऊन माघारी परतली. मात्र शेफालीने काही गिअर कमी केला नाही. तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरुच ठेवली.

डावाच्या सुरुवातीला स्म्रिती मंधाना आणि शेफाली वर्माने २९२ धावा जोडल्या. त्यानंतर तिने जेमिमा रॉड्रिग्जसोबत मिळून संघाचा गाडा पुढे नेला. सुरुवातीला तिने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंच शतक झळकावलं. शतक झळकावल्यानंतर तिने धावांची गती आणखी वाढवली. ज्यावेळी ती दुहेरी शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्यावेळी तिने सलग २ षटकार खेचले आणि १ धाव घेत दुहेरी शतक साजरं केलं.

शेफाली वर्मा ही महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद दुहेरी शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे. तिने या डावात १९७ चेंडूंचा सामना करत २३ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने २०५ धावांची खेळी केली. ती भारतीय संघासाठी दुहेरी शतक झळकावणारी मिताली राजनंतर दुसरीच भारतीय फलंदाज ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT