Yuzvendra-Dhanashree Divorce Saam Tv
Sports

Yuzvendra Chahal: 'आधी जोरदार भांडण करायची,अन् मग डायमंड..', युझवेंद्र चहलने सर्वकाही सांगितलं

Yuzvendra Chahal On Dhanashree Varma: भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा गेल्या काही महिन्यांपासून तुफान चर्चेत आहेत. दोघांचाही घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र दोघांकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. दरम्यान आता दोघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

काय म्हणाला चहल?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा झलक दिखलाजा शो च्या ११ व्या हंगामातील आहे. या शो मध्ये दोघांनाही गेम खेळण्यासाठी बोलावलं जातं. दोघांनाही प्लेकार्ड्स दिले जातात. तर समोरच्या व्यक्तीला ते कार्ड नेमकं कोणतं आहे, हे ओळखायचं होतं. यादरम्यान धनश्रीकडे डायमंडचा कार्ड येतो. त्यावेळी चहल म्हणतो, तेच आहे जे तू नेहमीच डिमांड करते. तेव्हा मी विचारते, काय?

नंतर दिलं स्पष्टीकरण

चहल तिला हिंट देतो पण धनश्रीला काही ओळखता येत नाही. त्यावेळी चहल तिला म्हणतो, जेव्हा वाद होतात तेव्हा तू काहीतरी डिमांड करतेस. त्यावेळी धनश्री म्हणते, की मी माफी मागायची डिमांड करते. त्यावेळी चहल स्पष्टीकरण देत म्हणतो की, ही डिमांड मागते माझ्याकडून.

दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अन्फॉलो केल्यापासून दोघांच्याही घटस्फोटाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर एकमेकांसोबतचे फोटोही डिलिट केले होते. यावरून दोघांचाही घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली.

मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी दोघांचाही अधिकृतकरित्या घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी असेही म्हटले गेले होते की, धनश्रीला ६० कोटी रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. मात्र या बाबतही कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT