KKR vs RCB, IPL 2023 Shardul Thakur Batting: भारतीय संघात एक असा खेळाडू आहे जो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. जोरदार कामगिरी करत या खेळाडूने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा विश्वास जिंकायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची जागा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हार्दिकची कारकीर्द संपवणार हा खेळाडू..
यावर्षी भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत शार्दूल ठाकूर जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरद्ध झालेल्या सामन्यात त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत २९ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी केली.
अवघ्या ८९ धावसंख्येवर कोलकाता नाईट रायडर्स संघातील ५ फलंदाज माघारी परतले होते. असे वाटू लागले होते की कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव १२० धावांच्या पुढे जाणार नाही. मात्र त्यावेळी शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला आणि त्याने तुफानी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या २०० च्या पार पोहचवली. (Latest sports updates)
यावर्षी भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत शार्दूल ठाकूर जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरद्ध झालेल्या सामन्यात त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत २९ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी केली.
अवघ्या ८९ धावसंख्येवर कोलकाता नाईट रायडर्स संघातील ५ फलंदाज माघारी परतले होते. असे वाटू लागले होते की कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव १२० धावांच्या पुढे जाणार नाही. मात्र त्यावेळी शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला आणि त्याने तुफानी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या २०० च्या पार पोहचवली.
या तुफान खेळीच्या जोरावर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. त्याने या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ९ चौकार मारले. आता या खेळी नंतर हार्दिक पंड्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण शार्दूल ठाकूरने तीनही फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. तर हार्दिक पंड्या केवळ वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळतोय.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शार्दुल ठाकूरने तुफानी खेळी करत ६८ धावा केल्या.
तर रहमनुल्लाह गुरबाजने ५७ धावांची खेळी केली. रिंकू सिंगने देखील ४६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद २०४ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही.
फाफ डू प्लेसिस २३ तर विराट अवघ्या २१ धावा करत माघारी परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव अवघ्या १२३ धावांवर संपुष्टात आला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८१ धावांनी गमवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.