वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. तर इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरु आहे. ज्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. ते खेळाडू टी-२० ब्लास्ट स्पर्धेत खेळताना दिसून येत आहेत. पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद देखील या स्पर्धेत खेळतोय. दरम्यान या स्पर्धेतील एका सामन्यात तो २ वेळा बाद झाला मात्र तरीही तो नाबाद राहिला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
तर झालं असं की, शुक्रवारी (२१ जून) व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्ट स्पर्धेत यॉर्कशायर आणि लँकेशायर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात शान मसूद धावबादही झाला आणि हिट विकेटही झाला. मात्र एमसीसीच्या एका नियमामुळे अंपायरने त्याला नाबाद घोषित केलं.
या सामन्यात शान मसूद फलंदाजी करत असताना १५ व्या षटकात त्याने स्कुप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट खेळण्यापूर्वीच त्याचा पाय यष्टीला जाऊन धडकला आणि तो हिट विकेट झाला. चेंडू टाकताच अंपायरने नो बॉलचा इशारा केला. कारण गोलंदाजाचा पाय क्रिझच्या बाहेर होता. त्यामुळे तो वाचला.
शान मसूदने शॉट खेळल्यानंतर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने धाव घेतली. मात्र शान मसूद हिट विकेट झाल्यामुळे धावलाच नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केलं. मात्र अंपायरने त्याला नाबाद घोषित केलं. कारण अंपायरच्या असं निदर्शनात आलं की, शान मसूद धाव घेण्याच्या प्रयत्नान नव्हता.
एमसीसीच्या ३१.७ नियमानुसार, फलंदाजाने बाद झाल्याच्या गैरसमजातून विकेट सोडला, तर अंपायर हस्तक्षेप करु शकतात. त्यामुळे शान मसूदला नाबाद घोषित केलं गेलं. हा चेंडू त्याच्या हेल्मेटच्या ग्रीलला जाऊन लागला होता. त्यामुळे त्याला कन्कशन नियमानुसार सल्ला हवा होता. त्यामुळे तो गोंधळून गेला होता, असं शान मसूदने सामन्यानंतर सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.