Marnus Labuschagne Catch: फ्लाईंग लाबुशेन! धावत आला अन् लांब डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल! पाहा VIDEO

Marnus Labuschagne Catch Video: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनने धावत डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे.
Marnus Labuschagne Catch: फ्लाईंग लाबुशेन! धावत आला अन् लांब डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल! पाहा VIDEO
marnus labuschagnetwitter

सध्या अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा सुरु असताना इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरु आहे. ज्या खेळाडूंचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आलेला नाही, असे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज मार्नस लाबुशेनने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. दरम्यान ग्लुस्टरशायर आणि ग्लेमॉर्मन यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मार्नस लाबुशेनने डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा काहिसा झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, ग्लेमॉर्गन संघाची गोलंदाजी सुरु असताना फिरकी गोलंदाज मेसन क्रेन १० वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी ग्लुस्टरशायर संघातील फलंदाज बेन चार्ल्सवर्थने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्रेनने लेंथ चेंडू टाकला, चार्ल्सवर्थने फटका तर मारला,मात्र त्याचा अंदाच चुकला. चेंडू हवेत उंच गेला. त्यावेळी चेंडू हा मार्नस लाबुशेनपेक्षा बराच लांब होता. मात्र तो धावला आणि लांब डाईव्ह मारत एकहाती झेल टिपला. या अविश्वसनीय झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Marnus Labuschagne Catch: फ्लाईंग लाबुशेन! धावत आला अन् लांब डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल! पाहा VIDEO
IND vs AFG, Highlights: अफगाणिस्तानला तर हरवलं, मात्र या २ कारणांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

मार्नस लाबुशेनच्या कॅचवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ग्लेमॉर्गन संघाला या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लेमॉर्गन संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ग्लुस्टरशायर संघाने शेवटच्या चेंडूवर ८ गडी राखून विजय मिळवला.

Marnus Labuschagne Catch: फ्लाईंग लाबुशेन! धावत आला अन् लांब डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल! पाहा VIDEO
IND vs AFG, Super 8: सूर्याचा क्लासिक शॉट की हार्दिकची पॉवर हिटींग; कोणता शॉट तुम्हाला सर्वात जास्त आवडला? पाहा VIDEO

मार्नस लाबुशेनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५० कसोटी सामन्यांमध्ये ४११४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ शतकं आणि २० अर्धशतकं झळकावली आहेत. तर ५२ वनडे सामन्यांमध्ये त्याने १६५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ११ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह १ टी-२० सामन्यात त्याला २ धावा करता आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com