shams mulani twitter
क्रीडा

Ranji Trophy: मुंबईकर शम्स मुलानीने घेतल्या १० विकेट्स! बोनस पॉईंटसह मुंबईचा सलग दुसरा विजय

Mumbai vs Andhra Pradesh Ranji Trophy: मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार खेळ करत आंध्रप्रदेशवर जोरदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Mumbai vs Andhra Pradesh, Ranji Trophy:

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार खेळ करत आंध्रप्रदेशवर जोरदार विजय मिळवला आहे.

हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे. या सामन्यात मुंबईला विजय मिळवून देण्यात शम्स मुलानीने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले आहेत.

शम्स मुलानी घेतल्या १० विकेट्स...

आंध्रप्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीने १० गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या बळावर मुंबईने १० गडी राखून बाजी मारली आहे. या विजयासह मुंबईने बोनस गुणांची कमाई केली आहे.

मुंबईने आंध्रप्रदेश संघाला फॉलोऑन दिला होता. धावांचा पाठलाग करताना आंध्रप्रदेश संघाकडून शेख रशीदने ६६ आणि हनुमा विहारीने ४६ धावांची खेळी केली. मुंबईकडून गोलंदाजी करताना शम्स मुलानीने ४ गडी बाद केले.

त्याच्या या शानदार गोलंदाजीच्या बळावर आंध्रप्रदेशचा डाव अवघ्या २४४ धावांवर आटोपला. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ३४ धावांची गरज होती. हे आव्हान मुंबईने सहज पूर्ण केलं. शम्स मुलानी या सामन्याचा हिरो ठरलाय. त्याने १६१ धावा खर्च करत १० गडी बाद केले. (Latest sports updates)

मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ३४ धावांची गरज होती. हे आव्हान मुंबईच्या फलंदाजांनी ८.४ षटकात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने एक बोनस गुणासह ७ गुणांची कमावली. मुंबईचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना होता. तर स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईने बिहारवर १ डाव आणि ५१ धावांनी विजय मिळवला होता. या दोन विजयांसह मुंबईचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

बंगालने केली ३ गुणांची कमाई..

तर दुसरीकडे बंगालने उत्तर प्रदेशवर मोठी आघाडी घेतली होती. या आघाडीच्या बळावर बंगालने ३ गुणांची कमाई केली आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात बॅड लाईटमुळे चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही.

यूपीचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करताना अवघ्या ६० धावा करु शकला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगाल संघाने १८८ धावा करत १२८ धावांची आघाडी घेतली.दुसऱ्या डावात यूपीने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ गडी बाद १६८ धावा केल्या होत्या. यजमान संघाने ५० षटकांची आघाडी घेतली. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT