MI New York vs Texas Super Kings: अमेरिकेतही मुंबईचा जलवा! सुपर किंग्सच्या नांग्या ठेचत MI न्यूयॉर्कचा अंतिम फेरीत प्रवेश

Major League Cricket: मेजर लिग क्रिकेट स्पर्धेतील चँलेंजर सामना एमआय न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
mi newyork
mi newyork saam tv
Published On

MI New York vs Texas Super Kings Match Highlights: आयपीएल स्पर्धेत धुमाकूळ घालणारी मुंबई इंडियन्सची फँचायजी अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लिग क्रिकेट स्पर्धेत देखील धुमाकूळ घालताना दिसुन येत आहे. मेजर लिग क्रिकेट स्पर्धेतील चँलेंजर सामना एमआय न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

हा सामना जिंकून एमआय न्यूयॉर्क संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर १५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एमआय न्यूयॉर्क संघाने १९ व्या षटकात या धावांचा यशस्वी पाठलाग करत जोरदार विजय मिळवला.

mi newyork
IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? रोहितसोबत हा खेळाडू उतरणार मैदानात; पाहा प्लेइंग ११

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या एमआय न्यूयॉर्क संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर पहिला विकेट गमावला होता. सलामीवीर फलंदाज स्टेडन अवघ्या ६ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर सहाव्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर दुसरा सलामीवीर फलंदाज जहागीर बाद होऊन माघारी परतला. त्याने १८ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची खेळी केली. त्याला केल्विनने बाद करत माघारी धाडले.

एमआय न्यूयॉर्क संघाची गाडी रुळावर येणार इतक्यात कर्णधार निकोलस पुरन बाद होऊन माघारी परतला. पुरन आणि डेवाल्ड ब्रेविसने मिळून ३० धावांची भागिदारी केली. तर पुरन २३ धावांची खेळी करत माघारी परतला.

युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने एमआय न्यूयॉर्कच्या विजयात मोलाची भुमिका बजावली. त्याने २० चेंडूचा सामना करत ४ षटकारांच्या साहाय्याने ३३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. (Latest sports updates)

mi newyork
IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

टेक्सास सुपर किंग्ज संघाची गोलंदाजी..

टेक्सास सुपर किंग्ज संघातील गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. या संघाकडून केल्विन सेवेजने ४ षटकात २७ धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर डॅनियल सॅम्सने १ गडी बाद केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com