होय...शाहिद आफ्रिदी पुन्हा येतोय! 'या' संघाकडून खेळणार सामना
होय...शाहिद आफ्रिदी पुन्हा येतोय! 'या' संघाकडून खेळणार सामना Saam Tv
क्रीडा | IPL

होय...शाहिद आफ्रिदी पुन्हा येतोय! 'या' संघाकडून खेळणार सामना

वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) वयाच्या 44 व्या वर्षी क्रिकेटमध्ये परतणार आहेत. तो नेपाळच्या एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये (Everest Premier League) खेळताना दिसणार आहे. शाहिद आफ्रिदी काठमांडू किंग्ज इलेव्हनकडून खेळताना दिसणार आहे. नेपाळचा स्टार खेळाडू संदीप लामिछानेही या संघात आहे.

शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली संदीप लामिछानेने टी-20 मध्ये पदार्पण केले होते. वास्तविक, संदीपने आयसीसी वर्ल्ड इलेव्हन संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी -20 सामना खेळला. आफ्रिदी या संघाचा कर्णधार होता. आता हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहेत.

तथापि, यापूर्वी हे दोन्ही खेळाडू काही स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्धही खेळले आहेत. अफगाणिस्तान प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदी आणि संदीप लामिछाने एकमेकांविद्ध खेळले आहेत.

यावर्षी 25 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान एव्हरेस्ट प्रीमियर लीग खेळली जाईल. कीर्तीपूर (नेपाळ क्रिकेट) मधील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सर्व सामने खेळले जातील. या स्पर्धेत 6 संघ आहेत. या संघात विराटनगर वॉरियर्स, चितवन टायगर्स, काठमांडू किंग्ज इलेव्हन, भैरहवा ग्लेडिएटर्स आणि पोखरा रायनोस आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

SCROLL FOR NEXT