Shahid Afridi on Pahalgam Terrorist Attack X
Sports

Pahalgam Attack : उठसूट आमच्याकडे बोट का दाखवता? पुरावा काय? शाहिद आफ्रिदीने भारताला केला सवाल

Pahalgam Terrorist Attack : मंगळवारी (२२ एप्रिल) रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावरुन भारताने पाकिस्तानवर कारवाई देखील केली आहे.

Yash Shirke

Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ जणांचा जीव गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाले. हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आले. भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारत सरकारकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुरावा मागितला. दुबईमध्ये पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, 'हल्ला झाला आणि लगेच त्यांनी पाकिस्तानच या हल्ल्यासाठी कारणीभूत आहे असे मानले. हा हल्ला पाकिस्तानने केला याचा पुरावा सादर करा. भारताने कोणताही पुरावा न देता पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताची भूमिका चुकीची आहे'

शाहिद आफ्रिदीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतकांबद्दल दु:ख व्यक्त केले. यात पाकिस्तानचा हात नाहीये. दहशतवादाला कोणताही धर्म पाठिंबा देत नाही. दोन्ही देशातील समस्यांवर संवाद साधायला हवा. संघर्षाने कोणाचाही फायदा होणार नाही. संवाद साधून आपण समस्या सोडवू शकतो असे वक्तव्य आफ्रिदीने केले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला पहिल्यांदाच स्थगिती दिली. अटारी सीमा बंद करण्यात आली. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. भारताकडून पाकिस्तानी राजनायिकांवर कारवाई करण्यात आली, उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली. अशा प्रकारे भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT