shahid afridi predicts 4 semi finalist of icc t20 world cup 2024  saam tv
Sports

T-20 WC 2024 Prediction: शाहिद आफ्रिदीची मोठी भविष्यवाणी! म्हणतो हेच 4 संघ गाठणार T-20 WC ची सेमीफायनल

T-20 World Cup 2024, Shahid Afridi Prediction: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलध्ये जाणार याबाबत शाहिद आफ्रिदीने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे. नुकताच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २००७ आणि २००९ मध्ये झालेल्या स्पर्धेत शाहिद आफ्रिदीने प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. आता त्याने आगामी टी -२० वर्ल्डकपूर्वी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्युझलंड हे ४ संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात.

भारत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १-१ वेळेस टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. तर न्यूझीलंडला आजवर एकही ट्रॉफी जिंकता आलेले नाही. २०२१ मध्ये झालेल्या फायनलमध्ये न्युझीलंडने प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं तर गेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत या संघाला भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र तरीदेखील या संघाने दमदार कमबॅक केलं आणि फायनलपर्यंत मजल मारली. मात्र फायनलमध्ये या संघाला इंग्लंडकडून पराभव लागला.

याबाबत बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ' माझ्या मते पाकिस्तान फायनलमध्ये पोहचेल. कारण वेस्टइंडीज आणि अमेरिकेतील परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल असू शकते. इतर कुठल्याही संघाकडे मजबूत गोलंदाजी आक्रमण नाहीये. आमच्याकडे वेगवान गोलंदाज आहेत. या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

Satara Gazetteer : सातारा गॅझेटियर नेमकं आहे तरी काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT