वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. ज्यावेळी भारतीय संघाची फलंदाजी सुरू होती त्यावेळी लाईव्ह टीव्ही शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय फलंदाजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचं म्हणणं होतं की, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला नडतो. आता भारतीय संघाच्या पराभवानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद युसुफ यांनी सहभाग घेतला होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघ फलंदाजी करत असताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल पावरप्लेच्या षटकात बाद होऊन माघारी परतले. त्यावेळी शाहिद आफ्रिदीने भारतीय फलंदाजांना टार्गेट करत वादग्रस्त वक्तव्य केलं.
ज्यावेळी श्रेयस अय्यर बाद झाला त्यावेळी शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आलं की, हा मोठ्या सामन्याचा दबाव आहे का? यावर उत्तर देत तो म्हणाला की,'नाही, हा मोठ्या सामन्यातील दबाव नाही. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. ते याच वातावरणात मोठे झाले आहेत. त्यांना या क्राऊडसमोर खेळण्याची सवय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे दबावावर अवलंबून आहे. हे त्यांनाही माहीत आहे, की जेव्हा आपण सलग सामने जिंकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो. हीच गोष्ट नडते. कारण ते ज्या ज्या चेंडूवर बाद झाले, तो बाद होण्यासारखा चेंडू नव्हता. ' (Latest sports updates)
फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकलं आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात २४० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.