rohit sharma virat kohli wicket twitter
Sports

Shaheen Shah Afridi Bowling: भारताचे शेर आफ्रिदीसमोर ढेर! शाहिनने विराट अन् रोहितची केली दांडी गुल; पाहा VIDEO

Rohit Sharma Virat Kohli Wicket : शाहिन आफ्रिदीने विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद करत माघारी धाडले आहे.

Ankush Dhavre

IND VS PAK LIVE, Shaheen Shah Bowling:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना सुरू आहे. श्रीलंकेच्या पल्लीकेलेमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला शाहिन आफ्रिदीने दुहेरी धक्का दिला आहे.

शाहिनने उडवली दांडी..

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने सुरूवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माला शाहिन आफ्रिदीने ११ धावांवर बाद करत माघारी धाडले आहे. शाहिन आफ्रिदीचा पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू टप्पा पडून आत आला आणि काही कळायच्या आत हा चेंडू रोहितची दांडी उडवून गेला.

विराटचीही उडवली दांडी..

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी आला होता. भारताला सुरूवातीला मोठा धक्का बसल्यानंतर असं वाटलं होतं की, विराट मोठी खेळी करेल. मात्र असं काहीच झालं नाही. सातवे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिनने तिसऱ्याच चेंडूवर विराटची दांडी गुल केली. विराट कोहली या डावात अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

अशी आहे पाकिस्तान संघाची प्लेइंग ११ :

फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रउफ आणि नसीम शाह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT