shaheen afridi sixes twitter
Sports

Shaheen Afridi Sixes: शाहीन आफ्रिदीचा हल्लाबोल! 6,6,6,6 मारत RCB च्या गोलंदाजाची केली धुलाई, पाहा VIDEO

Shaheen Afridi Batting: नुकताच त्याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोजदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Viral Cricket Video: पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा भेदक मारा करण्यासाठी ओळखला जातो. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर तो फलंदाजांची दांडी गुल करत असतो. नेहमी गोलंदाजीमुळे चर्चेत राहणारा शाहीन आफ्रिदी आता आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे.

नुकताच त्याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोजदार व्हायरल होत आहे.

शाहीन आफ्रिदी सध्या इंग्लंडमधील प्रसिद्ध टी -२० लीग स्पर्धा, टी -२० ब्लास्ट स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत तो नॉटिंघमशायर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान वॉर्केस्टरशायर संघासोबत झालेल्या सामन्यात त्याने जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यातील १६ व्या षटकात शाहीन आफ्रिदीने ४ षटकार मारत मेहफिल लुटली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या मायकेल ब्रेसवेलला धु धु धुतलं आहे.

शाहीन आफ्रिदीने या षटकातील पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारले. यासह शाहीन आफ्रिदीने या सामन्यात नॉटिंगहमशायर संघासाठी दुसरी सर्वात मोठी खेळी केली. त्याने या सामन्यात ११ चेंडूंचा सामना करत २९ धावा ठोकल्या. (Latest sports updates)

शाहीन आफ्रिदीची खेळी व्यर्थ..

शाहीन आफ्रिदीची ही खेळी व्यर्थ ठरली आहे. कारण या सामन्यात नॉटिंगहमशायर संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५६ धावांनी हा सामना नॉटिंगहमशायर संघाच्या हातून निसटला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वॉर्केस्टरशायर संघाने ५ गडी बाद २२६ धावा केल्या होत्या.

या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मायकेल ब्रेसवेलने २७ चेंडूंचा सामना करत ५५ धावांची खेळी केली. तर धावांचा पाठलाग करताना नॉटिंघमशायर संघाकडून अ्ॅलेक्स हेल्सने ३५ चेंडूंचा सामना करत ७१ धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

SCROLL FOR NEXT