Shafali Verma World Cup Final Navi Mumbai : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघाने विश्वचषकावर नाव कोरले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच हा पराक्रम रचला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. २१ वर्षाच्या शेफालीने ७८ चेंडूत शानदार ८७ धावांची खेळी केलीच. त्यानंतर गोलंदाजी करताना महत्त्वाच्या दोन विकेट घेतल्या. रिप्लेसमेंटच्या स्वरूपात टीम इंडियात परतलेल्या शेफालीचं आज देशभरात कौतुक होतेय. पण फायनलमध्ये केलेल्या कामगिरीसाठी मिळालेला आत्मविश्वासाच्या मागे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत झालेली चर्चा आहे. सचिन तेंडुलकरसोबत ३० सेकंदाची चर्चा केली होती, त्यानंतर आत्मविश्वास वाढल्याचे शेफालीने सांगितलेय. (Shafali Verma 30 second talk with Sachin before final)
अंतिम सामना सुरू होण्याआधी २१ वर्षाची शेफाली वर्मा थोडी नर्व्हस होती. तिने मैदानावर सचिन तेंडुलकरला पाहिले अन् चर्चा करण्यासाठी गेली. मैदानावर सचिन तेंडुलकर आणि शेफाली वर्मा यांच्यामध्ये ३० सेकंदाची चर्चा झाली. शेफाली सांगते हाच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. शेफाली वर्मा म्हणाली, "सचिन तेंडुलकरला पाहिल्यानंतर मला वेगळाच आत्मविश्वास मिळाला. मी त्यांच्यासोबत चर्चा केल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढला. ते क्रिकेटचे मास्टर आहेत, त्यांना समोर पाहिले तर प्रेरणा मिळते." सामन्यापूर्वी सचिन सरांना पाहूनच मला खात्री पटली की मी आज काहीतरी खास करू शकते, असेही शेफालीने सांगितले.
शेफाली आणि स्मृती मानधना यांनी भारताच्या डावाची शानदार सुरूवात केली. शेफालीने स्मृती मानधना (४५ धावा) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२४ धावा) यांच्यासोबत भारताला चांगली सुरुवात करून दिली. शेफालीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शेफालीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २९८ धावांपर्यंत मजल मारली.
फलंदाजीनंतर शेफालीने गोलंदाजीतही जलवा दाखवला. आफ्रिकेचा संघ वरचढ ठरत होता, त्यावेळी शेफालीने महत्त्वाच्या २ विकेट घेतल्या अन् सामन्याला कलाटनी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे शेफालीने याआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात कधीच गोलंदाजी केली नव्हती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.