Indian women’s cricket world cup emotional moment : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने रविवारी क्रिकेट विश्वात नवीन अध्याय लिहिला. पहिल्यांदाच टीम इंडियाने वनडे विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघाचा दबदबा असणाऱ्या स्पर्धेत भारतीय रणरागिणींनी इतिहास घडवला. पण विजयानंतर भारताच्या पोरींमध्ये कुठलाही माज अथवा उन्माद दिसला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील खेळाडूंबाबत त्यांनी जे केले, त्याचं आज कौतुक होतेय. भारतीय महिला संघाने फक्त विश्वचषकच जिंकला नाही तर जगाचे हृदय जिंकलेय.
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने ५२ धावांनी आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भावूक झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या धायमोकलून रडू लागल्या. भारतीय महिला खेळाडूंनी विजयाचे सेलीब्रेशन सोडलं अन् त्यांना आधार दिला. टीम इंडियाच्या याचं कृतीचे जगभरात कौतुक होतेय. याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंतिम सामना संपताच भारतीय खेळाडूंकडून जल्लोष केला गेला. कित्येकवेला तुटलेले स्वप्न साकार झाल्यामुळे भारतीय महिलांचा आनद गगणात मावत नव्हता. पण दुसरीकडे मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अश्रू आवरता आले नाहीत. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघ यावेळीही ट्रॉफीपासून दूर राहिला. मैदानावरच खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हे पाहताच भारतीय खेळाडूंनी आपला आनंद बाजूला ठेवत त्यांच्या दुख सावरण्याचे काम केले अन् त्यांना धीर दिला.
कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्यासह इतर खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मिठी मारत धीर दिला. पराभवामुळे खचलेल्या खेळाडूंना धीर देत सांत्वन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुकही केले. या प्रसंगाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.